गेवराई । वार्ताहर 

तालुक्यातील महारटाकळी चेक पोस्टवर गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडल्याची घटना ताजी असताना रविवारी ता.9 रोजी रात्री शहरात छोटा हत्ती मधून दारूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर, कोल्हेर रोड वरील यशराज बियर शॉपी येथे छापा मारून पाच लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला असून एक जणास ताब्यात घेण्यात आले आहे. बिअर शॉपीचा मालक फरार आहे. वाहन चालकास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून ही सर्व कारवाईतील मुद्देमाल 4 लाख 75 हजार 623 रूपये आहे.

,गेवराई शहरातून रविवारी रात्री अकराच्या सुमारास क्र. (एम एच 46 ऐई 2495)  हा टाटा चा छोटा हत्ती रिक्षा जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दारू चे बॉक्स आढळून आले.वाहन पोलीस स्टेशन आणून त्या ड्रायवर ला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो दारू चे बॉक्स कोल्हेर रोड येथील यशराज बियर शॉपी येथे विक्री साठी नेत असल्याचे तो म्हणाला त्यानुसार कोल्हेर रोड येथील यशराज बियर शॉपी ची तपासणी केली असता तेथे बियरचे 169 बॉक्स आढळून आले. साधारणपणे पाच लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला असून सदरील रिक्षा चालक गणेश कल्याण जराडे (23 रा. संजय नगर, गेवराई) याच्यावर भादंवि कलम (ई)(ड)81, 83 सहकलम 188, 279, 270, 190 सह 51 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्या प्रमाणे केला असून ताब्यात घेण्यात आले आहे. कबीर शॉपी चा मालक हा फरार झाला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा जोगदंड, ए.एस.आय.आइटवर यांनी  कारवाई केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा जोगदंड करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.