बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी पाठवलेले 23 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर रविवारी (दि.10) सकाळी 11 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 9 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते ते सर्व निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी यांनी दिली. दरम्यान आता रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण तपासणी झालेले 330 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment