बीड । वार्ताहर

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाचे सर्व घटक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. अशावेळी राज्यातील जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी बीडमधील दोन विद्यार्थीनींनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात म्हटले आहे, गेल्या दिड महिन्यापासून कोरोनासाठी लढणार्‍या  डॉक्टर, परिचारिका, पोलीस प्रशासन आणि कोरोना योध्दांना मदत करण्यासाठी आम्ही दोघी बीड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहोत. सुुनीता बोडखे ही विद्यार्थीनी बीड येथील विधी महाविद्यालयात तर सुजाता ठोसर ही केएसके महाविद्यालयात शिक्षण घेते. या दोघींनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोरोनाविषयी जनजागृती करण्याची संधी देण्याची मागणी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.