शिरुरकासार । वार्ताहर
तालुकयातील शिरापूर गात येथील शेत गट क्र.85 मध्ये शेतात काम करणार्या भावकीतील दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना काठी, दगड व चापटाबुक्क्याने मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीवरुन या प्रकरणात 11 जणांवर शिरुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि.8) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
वैजिनाथ बापुराव तांबारे यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या कंपाऊंड व शेतात काम करत असताना आरोपींनी त्यांना व त्यांच्या इतर सहकार्यांना काठी, दगड व चापटाबुक्क्याने मारहाण केली.यावरुन शिवाजी तांबारे, दिलीप तांबारे, निलेश तांबारे, कृष्णा तांबारे व सुधाकर तांबारे (सर्व रा.जांब) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान सुधाकर बाबुराव तांबारे यांनीही याच आशयाची तक्रार नोंदवली.त्यावरुन नाथा तांबारे, वैजिनाथ तांबारे, तुकाराम तांबारे, बळीराम तांबारे, अलका तांबारे, विमल तांबारे (सर्व रा.जांब) यांच्यावर शिरुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार सानप व सहाय्यक फौजदार वाघमारे या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment