अंबाजोगाई । वार्ताहर

चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा सासरच्या लोकांनी वेळोवेळी शारिरीक व मानसिक  छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला. तालुक्यातील ममदापूर येथे मंगळवारी (दि.5) ही घटना घडली. मयत विवाहितेच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती व सासूविरुध्द अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलीसांच्या माहितीनुसार, शितल अतुल पवार (28,रा.ममदापूर,ता.अंबाजोगाई) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शितलचे वडिल श्रीराम किशन माने (रा.तळणी मोहगाव,ता.रेणापूर) यांच्या फिर्यादीनुसार, ममदापूर येथे सासरी नांदत असताना शितलला तिची सासू उषा गोविंद पवार व पती अतुल गोविंद पवार यांनी स्वंयपाक करण्याच्या कारणावरुन तसेच तिच्या चारित्र्यावर संशयावरुन छळ केला. दरम्यान तुला झालेल्या दोन मुली माझ्या नाहीत असे म्हणत पती अतुल हा चारित्र्यावर संशय घेत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने 5 मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केले. उपचारासाठी तिला अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले.तिथे  उपचार सुरु असताना शुक्रवारी (दि.8) पहाटे दिडच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती अतुल व सासू उषा पवार या दोघांविरुध्द अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला उपनिरीक्षक लटपटे पुढील तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.