बीड । वार्ताहर

प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक केल्यानंतर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथून दोन्ही आरोपींनी पलायन केले होते. यातील एका आरोपीला 5 मे रोजी ताब्यात घेतले होते. तर दुसरा फरार आरोपी शनिवारी (दि.9) तेलगाव परिसरात  पकडला. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

सय्यद इरफान सय्यद बिबन (20, रा.सिरसाळा) असे गजाआड केेलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापूर्वी पोलीसांनी आसेफ गफार बागवान यास वडवणीतून ताब्यात घेतले होते. या दोघांनी सिरसाळा येथील एका तरुणास ‘बाहेरगावी जाण्यासाठी आम्हाला दुचाकी का देत नाही’ म्हणत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर ते दोघेही पोलीसांना चकवा देत पळून गेले होते. नंतर एकास वडवणीतून तर दुसर्‍यास सिरसाळ्यातून शनिवारी ताब्यात घेण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.