चेकपोस्टवर दारु विक्रेत्यास पोलीसांनी पकडले रंगेहात
परळी । वार्ताहर
चेकपोस्ट चुकविण्यासाठी काही जण नामी शक्कल लढवून प्रशासनाला हुलकावणी देत आहेत. असाच एक प्रकार परळीतील एका चेकपोस्टवर शनिवारी सकाळी 5.30 च्या सुमारास उघडकीस आला आहे.प्रशासनाला हुलकावणी देणार्या एकाला पकडले असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या आरोपीला चेकपोस्टवर अडवले तेव्हा सांगितले गेले की, पोत्यात भाजीपाला आहे. पण संशयाने तपासणी केली तर हातभट्टीची दारु निघाली.
परळी शहर व तालुक्यातील मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी विषम तारीख असल्याने शिथिलता असल्याने बाजारासाठी नागरिक बाहेर पडले. शहरालगत असलेल्या मेरुगिरी रस्त्यावरून येताना चेकपोस्टवर कर्मचार्यांना परळीकडे दुचाकीवरून निघालेल्या एकाला थांबवले व काम काय आहे? बाहेर पाण्याच्या कारणाची विचारणा केली. तेव्हा भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जात असल्याचे या व्यक्तीने सांगितले. परंतु दुचाकीवर बांधलेल्या पोत्यात भाजीपाला नसल्याचा संशय चेकपोस्टवरील कर्मचार्याला आला. त्यामुळे तपासणी केली असता त्यात हातभट्टीची दारु आढळून आली. त्यानंतर या व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.वशिष्ट भानुदास कांदे (वय 39 रा.जिरेवाडी) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर त्वरित कारवाई केली असून गावठी हातट्टीची 2500 रुपयांची तयार दारु हस्तगत करण्यात आली आहे. परळीमध्ये सर्व नागरिक चर्चा करीत आहेत की ज्या ठिकाणी दारू साठा तयार होत आहे त्याठिकाणी पोलिसांनी छापेमारी करून सुद्धा व गुन्हे दाखल करून सुद्धा हातभट्टी दारू व्यवसाय करणार्या व्यक्तींना सहजपणे मिळत आहे.
Leave a comment