बीड । वार्ताहर
येथील सोनार समाजातील हातावर पोट असलेल्या शिताबाई काशीनाथ टाक यांच्या कुटुंबीयांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती याचे भान ठेवून बीड येथील सोनार समाजाने आपण काही समाजाचे देणे लागतो म्हणून सीताबाई काशिनाथ टाक यांना रोख रक्कम पधरा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
समाजाच्यावतीने दहा हजार रुपये रुपये व मुंबई येथील गणेश दत्तात्रय टाक यांच्या वतीने पाच हजार असे एकूण पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तूचे किट त्यांना देण्यात आले. तसेच बीड शहरातील सुवर्णकार कारागिर, मोलमजुरी करणा-या समाज बाधवाना ही जीवनआवश्क वस्तू च्या किटचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी विजूशेठ कुलथे, सुधाकर दहिवाळ, हिम्मत बेद्रे मंगेश लोळगे, पत्रकार कमलाकर कुलथे, कैलास मैड, हनु डहाळे, उदय बागडे, गणेश बागडे यांच्या शुभहस्ते ही आर्थिक मदत व जीवनआवश्क वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजुशेठ कुलथे, देवाशेठ मानुरकर शाहणे, सुधाकर दहिवाळ, हिमंत बेदरे, पत्रकार कमलाकर कुलथे, कैलाश मैड, मंगेश लोळगे, एस.एम.बेदरे, गणेश बागडे, हनु डहाळे, भारत बेदरे, उदय बागडे, राम शाहणे, प्रमोद दहिवाळ या समाज बांधवानी आर्थिक मदत केली.
Leave a comment