पक्षाच्या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही; पंकजा मुंडे

 

मुंबई  । वार्ताहर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. दुखावलेल्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तसंच चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं. यानंतर त्यांनी पंकजांना फोन लावले. परंतू पंकजांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. दिवसभरात त्यांना असे शेकडो फोन आल्यानंतर त्यांनी शेवटी कार्यकर्त्यांची ट्विटच्या माध्यमातून समजूत घातली.

आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे, पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना… ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे त्या म्हणातात, 'बस साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाहीत. कुणाकुणाला उत्तर देऊ?'.

भाजपने मला तिकीट नाकारलं याचा मला अजिबात धक्का बसला नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. म्हणजेच आपल्यासोबत असं होणार हे किंवा आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं, असंच त्यांच्या या ट्विटमधून सूचित होत आहे. नव्याने जाहीर झालेल्या उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पक्षाच्या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही; पंकजा मुंडे

भारतीय जनता पक्षाने विधान परिषदच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून भाजपकडून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून मला या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही, बस.साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.