गेवराई । वार्ताहार
येथील नगर परिषदेच्या 90 कर्मचार्यांची शुक्रवार ता.8 रोजी सकाळी अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालयात मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांच्याशी चर्चा करून, नपच्या सर्व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी विनंती केली होती.
शुक्रवार ता.8 रोजी सकाळी अकरा वाजता सर्व कर्मचार्यांची हिमोग्लोबीन,लिव्हर, किडणी फंक्शन, ब्लड ग्रुप, शुगरची मोफत तपासणी करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या 90 कर्मचार्यांची शुक्रवार ता.8 रोजी सकाळी अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालयात मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. सध्या कोरोनांच्या पार्श्वभूमीवर गेवराई नगर परिषदेचे सर्व सफाई कामगार, कर्मचारी चोवीस तास सेवेत असून, त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांना या संदर्भात विनंती केली होती. त्यानुसार रूग्णालयाने जवळपास नव्वद स्त्री-पुरूष कर्मचार्यांची तपासणी केली आहे. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सराफ, डॉ.नोमाणी महमंद, डॉ.लेंडगुळे यांनी कामगार व कर्मचार्यांची तपासणी करून त्यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी सोशल डिस्टंन्सिंग काळजी घेण्यात आली होती.
Leave a comment