पिडीता सहा महिन्याची गर्भवती

केज । वार्ताहर

घरात कोणी नसल्याचे पाहून तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर गत सहा महिन्यापूर्वी जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. दरम्यान यातून पीडिता गर्भवती राहिली असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

केज तालुक्यातील एका गावात एक ऊसतोड मजूर पत्नी व मुलीसोबत ऊसतोडणी करुन कुटुंबाची उपजिविका भागवत होता. मजूराच्या 16 वर्षीय मुलीवर जवळच्या नातेवाईकाने तिच्या घरात कोणी नसल्याचे पाहून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी त्याने तिला दिली होती. दरम्यान नंतरही त्याने तिच्याशी कुकर्म तिच्याशी केले. ऊसतोडणीचा हंगाम संपल्यानंतर पीडिता कुटुंबासह गावी परत आली तेव्हा तिच्यात शारीरिक बदल दिसून आला. नंतर नातेवाईकांंनी या पीडितेची केजच्या खासगी रुग्णालयात तपासणी केली असता ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबियांनी केज ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक  प्रदीप त्रिभुवन यांच्यासमोर पीडितेच्या कुटुंबाने घडलेली हकीकत कथन केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गु.र.नं. 174 /2020 कलम 376,376(3),376,(फ) 452,506,34 भा.द.वि. सह कलम 4,6,8,12 प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम 2012 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. श्रीराम उपनिरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.