बीड । वार्ताहर
शहरातील एकनाथनगर भागात एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.8) दुपारी 4 वाजता उघडकीस आली.आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
प्रिती अमोल मस्के (28) असे त्या विवाहितेचे नाव आहे. आठ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. प्रिती यांचे पती पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहेत. प्रिती सासूसोबत बीडमध्ये राहत होत्या. शुक्रवारी दुपारी 4 वाजता पंख्याला साडीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.घटनास्थळी उपअधीक्षक भास्करराव सावंत, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला , सहायक निरीक्षक भारत काळे यांनी भेट दिली.
Leave a comment