अंबाजोगाई । वार्ताहर
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालयाच्या कपांउडच्या बाहेर असलेल्या एका खड्डयात दोन ते तीन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडले.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.तत्काळ त्या नवजात जखमी अर्भकास स्वाराती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची तब्येत चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी (दि.8) स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालयाच्या पी.जी.हॉस्टेलच्या लगत असलेल्या कंपाऊंडच्या बाहेरील एका खडयात पुरूष जातीचे नवजात अर्भक सापडल्याची घटना घडली आहे. आजूबाजूला उपस्थितांना रडण्याचा आवाज आला.त्यामुळे ही बाब उघडकीस आली.तात्काळ त्यांनी घटनेची माहिती सुरक्षा रक्षकास दिली.तेथुन पुढे रूग्णालय प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्या जखमी अर्भकास उपचारासाठी स्वाराती रूगणालयात दाखल करण्यात आले.अर्भकाची तब्येत चांगली असून पोलिस त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून घटनेचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Leave a comment