धारुर । वार्ताहर
शहरातील मठगल्लीत शुक्रवारी (दि.8) पुन्हा एक डेंग्यूचा नवीन रुग्ण मिळाला. पुर्वी पाठवलेल्या चार पैकी दोघांचे रिपोर्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.
कसबा विभागात मठ गल्ली तापीच्या रुग्णांमुळे प्रकाशझोतात आली होती. या भागात हिवताप निवारण विभागाने भेट देवून बिटींग, फोंगिंग मशीनने फवारणी करण्याच्या सुचना नगर परिषदेस दिल्या होत्या. या भागातील चौघांचे रक्ताचे नमुने आरोग्य विभागाने पाठवले होते. यापैकी दोघांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून शुक्रवारी एका रुग्णाचा खासगी तपासणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या भागात डेंग्यूची साथ असल्याचे सिध्द झाले असून आरोग्य विभागाकडून लवकरच पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. डॉक्टर्स असोशियनचे अध्यक्ष डॉ. मयूर सावंत यांनी या भागातील नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देत ड्राय डे पाळून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Leave a comment