आष्टी । वार्ताहर
संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्यामध्ये अडकलेल्या कामगारांना परजिल्हा, राज्यात जाण्यार्या कामगारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या वाहतूक सेवा सुरू केली असून अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे अडकलेल्या कामगारांना बस सेवा देण्यात आली आहे. या दोन बसमध्ये 50 कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची जिल्हा प्रशासनाने सोय केली आहे.
नगर ते जामखेड दरम्यान जिल्हा बंदी चेक नाका अंभोरा येथील चेकनाक्यावर सदरील बसची एन्ट्री करून सोडण्यात आले. यावेळी बस वाहक,पोलीस कॉन्स्टेबल सलम समेद,अभियंता प्रल्हाद तळेकर ,वैद्यकीय अधिकारी डॉ समबे मॅडम ,आरोग्य कर्मचारी खताळ,भरारी पथक सदस्य संतोष दाणी, बा.म.पवार,आदी उपस्थित होते.
Leave a comment