केद्रेकर साहेब, बीडप्रमाणे औरंगाबादलाही खाक्या दाखवा
खा.इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार
इन्फेक्टेड एरियामध्ये गर्दी करणार्या खा.जलील यांनाच कॉरन्टाईन करा
बीड । वार्ताहर
मुंबई,पुणे नंतर औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून काल एका दिवसात 5 नव्या रूग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस औरंगाबादला कोरोनाचा विळखा वाढत असून आतापर्यंत 378 कोरोनाग्रस्त रूग्ण औरंगाबादमध्ये सापडले आहेत. दरम्यान सातारा परिसरातील भारत बटालियन कॅम्पमधील 110 पैकी 72 एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली. मालेगाव येथे दीड महिना लॉकडाऊनचा बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील 110 जवानांची 5 मे रोजी परतल्यानंतर जवानांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. 6 मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी 72 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे डॉ पाडळकर यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराच्या विविध भागात हे रूग्ण सापडत असून औरंगाबाद येथून बीडला येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच खाजगी उद्योगातील अनेक लोक औरंगाबादहून अपडाऊन करीत आहेत. एवढेच नव्हे तर माजलगांव,गेवराई या तालुक्यातील बहुतेक शेतकरी आपला भाजीपाला,फळे औरंगाबादच्या बाजारपेठेत पाठवतात. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाला बीडमध्ये येण्यास उशीर लागणार नाही. याचा धोका प्रशासनाने लक्षात घ्यायला हवा बीड ला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ज्या पध्दतीने पॅक बंद केले आहे. त्या पध्दतीने औरंगाबाद येथील प्रशासनाने करायला हवे होते. परंतू औरंगाबादचे पोलिस आणि महसुल प्रशासन औरंगाबांदकरांवर नियंत्रण मिळवू शकले नाहीत का ? विशेष म्हणजे सुनिल केंद्रेकर यांच्या सारखा खमका अधिकारी विभागीय आयुक्त असतांना असा प्रकार कसा होऊ शकतो या बद्दलही बीड जिल्ह्यातील आर्श्यच व्यक्त करीत आहेत. केंद्रकर साहेब यांनी बीड मध्ये ज्या प्रमाणे खाक्या दाखविला होता त्याच प्रमाणे औरंगाबादला ही खाक्या दाखवावा आणि औरंगाबाद चे आरोग्य बिघडविणार्यांना खाक्या दाखवावा तरच औरंगाबाद नियंत्रणात येईल अशी चर्चा बीड मध्ये होऊ लागली आहे. औरंगाबाद मध्ये दिवसेदिवस रूग्ण वाढत असल्याने बीडकरांचीही धडधड वाढली आहे.
औरंगाबादचे खा.इम्तियाज जलील यांनी दोन दिवसापूर्वी दारूबंदीसाठी चागला निर्णय घेतला होता. मात्र काल त्यांनी परराज्यात जाणार्यां मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर सुविधा देण्याची घोषणा केली. यामध्ये त्यांचा काय स्वार्थ होता हे लक्षात आले नाही मात्र यामुळे त्यांच्या घरासमोर हजारे कामगार जमा झाले खा.इम्तियाज जलील यांनीच आपत्तीप्रतिबंधक कायद्याची पायमल्ली केली साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये सोशल डिस्टंसचे महत्त्व असते. त्या सोशल डिस्टंसचाही फज्जा पुर्णपणे उडला विशेष म्हणजे इम्तियाज जलील ज्या भागात राहतात तो भाग कोरोनाग्रस्त म्हणून जाहीर झालेला आहे. त्या भागामध्ये इम्तियाज जलील यांनी असा प्रकार करावा या बद्दलही आश्यचर्य व्यक्त केले जात आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी खा.जलील यांनी या संदर्भात टिका केली असून. खा.जलील हे औरंगाबादचे काळजी घेणारे आहेत की औरंगाबादचा धोका वाढविणारे अ ाहेत. हे लक्षात येत नाही. स्वत:चे महत्त्व वाढून घेण्यासाठी कोरोनाच्या संकट काळात त्यांचे राजकीय नाटक कश्यासाठी असा सवालही सुहास दाशरथे यांनी आपल्या फेसबुक वॉलच्या माध्यमातून केला आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त, महानगर पालीकाआयुक्त यांना कामाला लावावे आणि औरंगाबादमध्ये जी दिवसभर सवलत आहे त्याबद्दल योग्य निर्णय घ्यावा. बीड मध्ये प्रशासनाचा अतिरेक्त होण्याची भावना नागरीकांमधून व्यक्त केली गेली असली तरी जिल्हाधिकारी अथवा जिल्हाप्रशासनाच्या कुठल्याही निर्णयाला जनतेने थेट विरोध नोंदविलेला नाही अथवा प्रसारमाध्यमांनी देखील टिका केली नाही. औरंगाबादच्या प्रसारमाध्यांनी निदान ज्या शहरात राहतोत त्या शहराच्या काळजीपोटी प्रशासनाचा ढिसाळपणा वरिष्ठांच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते. मात्र तसा प्रकार झाला नाही. आता तरी आयुक्त केंद्रेकरांनी या मध्ये लक्ष घालून निदान बीडकरांसाठी तरी औरंगाबाद टाईट करावे तरच रूग्णांनी संख्या कमी होण्यास मदत होईल. औरंगाबादमधे ज्या पध्दतीने रूग्ण वाढत आहेत. त्यामध्ये गुणाकार पध्दतीने वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बीडकरांना धोका होऊ नये या काळजी पोटीतरी औरंगाबादमध्ये संचारबंदीचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे.
शहागडचे चेकपोस्ट टाईट करणे आवश्यक
बीड ,गेवराई, माजलगांव येथून औरंगाबाद वेगवेगळ्या कारणानिमित्त अपडाऊन करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक, प्राध्यापक यांची संख्याही मोठी आहे. फळे,भाजीपाला याचा व्यापार करणार्यांना व्यापार्यांचीही औरंगाबाद शहराशी सारखा संपर्क असतो. लॉकडाऊनमध्ये देखील ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. शहागड चेकपोस्टवर पैैसे घेऊन सोडणार्यांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहागडचे चेकपोस्ट टाईट करणे आवश्यक आहे. काही काळ औरंगाबादशी संपर्क तोडणे बीडसाठी गरजेचे होऊन बसले आहे. या सदंर्भात जिल्हाधिकारी रेखावार, पोलिस अधिक्षक पोद्दार यांनीच लक्ष घालावे.
Leave a comment