बीड । वार्ताहर
कुत्रे भुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शहरातील पेठ बीड भागात बुधवारी (दि.6) घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन 14 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
जयकिशन हनुमानप्रसाद पांडे (20) याच्या फिर्यादीनुसार, तो घरासमोर अन्या काही जणांसोबत मोबाइलवर पब्जी गेम खेळत होता. यावेळी कुत्रे भुंकल्याच्या कारणावरुन त्याच्यासह सहकार्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय मोबाइलही लांबविला. या प्रकरणी पवन राजपूत, किशन चौहाण, राणा चौहाण, रणवीरसिंग चौहाण, अक्षय राजपूत, सनी चौहाण, हबीब तांबोळी, पवन राजपूतची पत्नी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. पवन राजपूत (36) यांनीही तक्रार दिली. त्यानुसार, छेडछाडीचा जाब विचारला म्हणून तलवारीने हल्ला केल्यावरुन सहा जणांवर गुन्हा नोंद झाला. जयकिशन पांडे, गुरुप्रसाद पांडे, माधव पांडे, गौरव पांडे, सौरभ पांडे, हर्षद पांडे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सहायक निरीक्षक कैलास भारती, उपनिरीक्षक जी. एच. पठाण हे तपास करत आहेत.
Leave a comment