गोदावरी पात्रात पाणी सोडणेबाबत कार्यकारी संचालक श्री शिंदे यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना!  

जालना । वार्ताहर

राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.राजेश टोपे यांच्या उपस्थित गोदावरी पात्रात,बॅरेजेस व डाव्या कालव्यातून सर्व चार्‍यामध्ये पाणी सोडणे संदर्भात बैठक पार पडली.घनसावंगी मतदार संघातील शहागड,पाथरवला बु,जोगलदेवी,मंगरूळ,राजाटाकळी या बॅरेजेसमध्ये पाणी सोडणे बाबत शेतकर्‍यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली होती.

उन्हाळा सुरू असल्याने,नागरिकांचा व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही.शेतीमधील पिकांसाठी आवर्तन सोडणे गरजेचे होते.या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री राजेश टोपे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून गोदावरी पात्रात,बॅरेजेसमध्ये व डाव्या कालव्यातून सर्व चार्‍यांना पाणी सोडण्यासह राजाटाकळी बॅरेजेसमधून सिरसवाडीला पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री,  जयंत पाटील यांनी गोदावरी पाटबंधारे (कडा) औरंगाबाद,कार्यकारी संचालक श्री. शिंदे यांना दिल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.