बीड । वार्ताहर

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वा.सावरकर महाविद्यालयातील गणित विभागाने विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चैनल द्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

विभाग प्रमुख प्रा.डॉ.विनोद कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएससी प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित 23 व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी व गणित प्रेमी यांच्यासाठी उपलब्ध केले असून यासाठी त्यांना प्राचार्य डॉ.संजय शिरोडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विभागाने हे व्हिडिओ लेक्चर यूट्यूब चैनल,गूगल क्लासरूम, व्हाट्सअप इत्यादी माध्यमाद्वारे विद्यार्थ्यापर्यंत उपलब्ध केले आहेत.या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी उपयोग होणार असून करोना संकटामुळे थांबलेल्या शिक्षण प्रणालीला चालना मिळत आहे. नियमीत अभ्यास व परिक्षा यातील अंतर भरून काढण्यास मदत होणार आहे.सदरील व्हिडिओ लेक्चर चा उपयोग असंख्य विद्यार्थ्यांनी केला असून त्यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले आहे या उपक्रमामुळे कोरोना संकटाच्या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे शक्य झाल्याने पालक व संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून विभागाच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.