माजलगाव
देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण हे आपल्या देशावर आलेली फार मोठी आपत्ती आहे . ही आपत्ती आता सर्व लोकांनी दर करण्याचे ठरवले आहे . यासाठी अनेक हात सरसावले असून शासनाच्या मदती सह सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवत आपणही शासनाला थोडासा खारीचा वाटा देत मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक सामाजिक संस्था व मंडळ सरसावले त्यापैकी माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुशिल डक व डक परिवार हे करत आहेत .700 गरीब रोजंदार व वृध्दांना घरी जाऊन गहु , तांदुळ व किराना किटचे वाटप केले . यावेळी २४ तास स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना सुरक्षा देत कोरोना व्हायरसचे संक्रमण फैलावू नये म्हणून चोख बंदोबस्त पाळीत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शहर, ग्रामीण, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग महसूल विभागाचे ही आभार मानले . येथील गोरगरीब जनतेला ज्याना कोरोना या संसर्ग जन्य आजारामुळे संचार ( लॉकडाऊन ) बंदीमुळे आर्थिक नुकसान व हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली . आशा गरजु कुटुंबाला गहु तांदूळ व किराणा किटचे दि.4एप्रिल रोजी300आणि दि.5एप्रिल रोजी400असे 700 कुटुंबीयाना घरपोहच मोफत वाटप केले . या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे . सभापती अशोकराव डक, अँड भानुदास डक, अजिंक्य डक, यांच्या हस्ते वाटप केले यावेळी बंडू वाकळे, गोपाळ पैंजणे, अवधूत सोळंके, सतीश चाळक, तेजस कुल्थे, रवी वाकळे, हनुमान चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
Leave a comment