औरंगाबाद । वार्ताहर
शहरात कोरोनाचा १२ वा बळी गेला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
या रुग्णास कोरोनासह अन्य आजारही होते. जिल्हा रुग्णालयातील हा कोरोनाचा पहिला मृत्यू आहे. दरम्यान, सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ३७३ झाली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली आहे. आज शहरात 17 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 373 वर पोहचली आहे.
अगोदरच औरंगाबाद शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. त्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.आज आढळलेले रुग्ण हे जय भीमनगर, पुंडलीकनगर, रेल्वेस्टेशन, किलेअर्क, हमालवाडी, कटकट गेट या परिसरातील आहेत. यामध्ये दहा पुरूष व सात महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण व एक स्थलांतरितासह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत झालेले मृत्यू
- 5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू
- 14 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
- 18 एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 22 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
- 27 एप्रिलला किलेअर्क येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 28 एप्रिलला किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 1 मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू
- 2 मे नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 3 मे देवळाई येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
- 5 मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू
- 7 मे आसेफिया कॉलनीतील येथील ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
Leave a comment