शिरुर कासार । वार्ताहर
कार्यसम्राट आमदार सुरेश धस यांच्या आदेशानुसार शिरूर कासार शहरात पाणी पुरवठा करण्यात येत असून येथील फिल्टरची दुरावस्था झाली होती.या फिल्टर मधील वाळू बदलण्याची गरज लक्षात घेऊन शिरूर कासार शहराचे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, बांधकाम सभापती अरुण भालेराव, नगरसेवक सुनिल शिंदे, दादासाहेब हरिदास यांनी फिल्टरची स्वच्छता केल्याने शिरूरकरांना आता स्वच्छ पाणी मिळणार आहे.
शिरूर कासार शहरास पाणीपुरवठा करण्यात येणार्या टाकीजवळील फिल्टर खराब झाल्यामुळे अनेक दिवसापासून शहरास खराब पाणीपुरवठा होत होता. शहराला पाणीपुरवठा करणार्या तागडगांव आणि सिंदफणा तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे तलाव परिसरात जनावरांना धुण्याचे काम शेतकरी करत असल्यामुळे सदरील घाण व अस्वच्छ पाणी शहरवासीयांना मिळत होते. फिल्टर स्वच्छ केल्याशिवाय स्वच्छ पाणी मिळणार नाही याचा विचार करून लोकप्रिय आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार शहराचे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, बांधकाम सभापती अरुण भालेराव, नगरसेवक सुनिल शिंदे, गणेश भांडेकर दादासाहेब हरिदास यांनी फिल्टरची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला. फिल्टरची दुरूस्ती करण्यात आल्यामुळे शिरूर वासियांना आता शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
Leave a comment