बीड । वार्ताहर
जिल्हयातील सर्व बँका दि. 7 मे 2020 व 9 मे 2020 रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. तसेच सक्षम प्राधिकारी यांचेकडून पास प्राप्त करुन घेतले आहेत त्या संबंधित व्यक्ती यांना बँकेच्या सर्व सोयी-सुविधा या दिनांकास बँकेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात वरील सुट्टींच्या कारणामुळे बाधा येवू न देता या बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार आज दि.7 मे रोजी बुध्द पोर्णिमा व दिनांक 09 में 2020 रोजी दुसरा शनिवार निमित्त सुट्टी जाहीर केली असून दोन दिवस बैंक बंद राहिल्याने तसेच या् दोन्ही विषम दिनांकास बैंका बंद राहिल्यामूळे सदर परिस्थितीच्या कालावधीत लोकांना आर्थिक व्यवहार करणेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.याकरिता विषम दिनांकास संचारबंदीतुन सकाळी 7 ते सकाळी 9.30 या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे.
Leave a comment