बीड । वार्ताहर
शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात बीड नगरपालिकेत बसवलेली जीवनधारा कंपनीची एक वॉटर एटीएम मशिन व एक विद्युत पंप असे 17 हजारांचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर ठाण्यात मंगळवारी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बीड नगरपालिकेच्या वतीने शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात 15 हजार रूपये किमतीची एक वॉटर एटीएम मशिन व 2 हजार रूपये किमतीचा एक विद्युत पंप बसवण्यात आला होता. 4 ते 5 मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वॉटर एटीएम मॅनेजर धिरज दुधाळ यांनी शहर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment