परळी । वार्ताहर
येथील तहसिलदार डॉ.विपीन पाटील यांनी कारवाई करत वाळू चोरी उघड करीत तब्बल 6 ट्रॅक्टर पकडले आहेत. लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला असून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तेलसमुख येथील गंगेच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी वाळू चोरी पकडण्यासाठी सापळा रचला. दि.6 मे रोजी रात्री उशिरा त्यांनी बोरखेड कॅनॉलवर मुक्काम ठोकला. रात्री 2 वाजल्यापासून वाळुचे ट्रॅक्टर येण्यास सुरुवात झाली.तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी सकाळपर्यंत तब्बल सहा ट्रॅक्टर पकडले. या ट्रॅक्टरमधून वाळू असून सर्व जप्त करून सिरसाळा पोलीस ठाण्यात आणले तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांच्यासोबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी युवराज सोळंके, कोतवाल खाजा यांनी ही कारवाई केली.
Leave a comment