मुंबई । वार्ताहर
महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकार्याच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी.bit.ly/
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यलयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटबरोबर शेअऱ केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक गुगल फॉर्म ओपन होतो. यामध्ये माहिती देणार्याचा इमेल आयडी, संपूर्ण नाव, कंट्री कोड, संपर्क क्रमांक, कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये अडकले आहात, परदेशात जाण्याचं कारण काय, पासपोर्ट क्रमांक, व्हिजा कोणत्या प्रकारचा आहे, व्हिजाची मुदत कधी संपत आहे यासारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
Leave a comment