नवी दिल्ली -

गेल्या महिन्याभर देशभरातील दारू विक्रीची दुकाने लॉकडाउनमुळे बंद होती. पण कालपासून देशभरातील ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर लागलेल्या पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे दुकाने बंद करावी लागली. असेच काहीसे चित्र राजधानी दिल्लीमध्येही पाहायला मिळाल्यानंतर आता दिल्लीतील विद्यमान केजरीवाल सरकारने दारुवर 'स्पेशल कोरोना टॅक्स' लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. हा कर 'स्पेशल कोरोना फी'अंतर्गत आजपासून आकारला जाईल. यानुसार 'एमआरपी'वर 70% स्पेशल कोरोना टॅक्स आकारला जाणार आहे. याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने सोमवारी रात्री उशीरा काढला. हा नियम मंगळवारी सकाळपासून लागू झाला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वीच दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही दिला आहे. याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकाने सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

दरम्यान, काल (दि.4 ) जवळपास सर्वच शहरांमध्ये दारुची दुकाने सुरु होणार म्हणून दुकानांबाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाईन शॉपच्या बाहेर 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेक भागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दीमुळे पोलिसांना काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.

 

 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.