औरंगाबाद । वार्ताहर
शहरातील एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी कोरोनाचा ११ वा बळी गेला उपचार सुरू असताना भडकलगेट येथील ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.
हा रुग्ण २७ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल २८ रोजी पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. त्याला इतरही आजार होते, असे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले.
सोमवारी १४ रुग्ण, मंगळवारी २४
औरंगाबादेत सोमवारपर्यंत २९७ रुग्णसंख्या होती. सोमवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आले होते. २७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळीच २४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात २१ रुग्ण एकट्या जयभीमनगर येथील आहेत. बुद्धनगर, अजबनगर आणि संजयनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.
आतापर्यंत झालेले मृत्यू
- 5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू
- 14 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
- 18 एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 22 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
- 27 एप्रिलला किलेअर्क येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 28 एप्रिलला किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 1 मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू
- 2 मे नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
- 3 मे देवळाई येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
- 5 मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू
Leave a comment