बीड । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टर हे आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा हिच ईश्‍वर सेवा मानून सर्व डॉक्टर रात्रंदिवस रूग्ण सेवेसाठी धडपड करून सेवा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ.बालाजी जाधव यांनी राष्ट्रवादी वेल्फअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी कॉग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने बीड तालुक्यातील निमा संघटनेच्या डॉक्टरांना माजी आमदार अ‍ॅड.उषाताई दराडे यांच्या हस्ते 200 हुन अधिक फेस शिल्ड वाटप माऊली क्लिनिक येथे केले. 

निमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजित जाधव व माजी अध्यक्ष डॉ.रमेश घोडके यांनी परिश्रम घेऊन माऊली कृषपा क्लिनीक, धानोरा रोड, येथे सर्व डॉक्टरांना वाटप केले. यावेळी निमाचे वरिष्ठ डॉ.किरण देशपांडे, सचिव डॉ.संदीप बेदरे, कोषाध्यक्ष डॉ.स्वप्नील डंबरे, डॉ.प्रविण रत्नपारखी, डॉ.दत्ता साळुंखे, डॉ.कैलास दैंड, डॉ.एल.एल.योगे, डॉ.कुलदीप शहाणे, डॉ.दिनेश तुपे, आयुष अधिकारी डॉ.खाडे, डॉ.शेख, डॉ.अनंद कुलकर्णी व निमा वुमनच्या फोरमच्या सर्व महिला डॉक्टरांनी ही सहभाग नोंदवला, यामध्ये निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ. उज्वला वनवे, सचिव डॉ. जायभाये, डॉ.सुहासिनी जाधव, डॉ. सौ.वर्षा सानप, डॉ.डुंबरे, डॉ.बेदरे, डॉ.साक्षी साळुंके आदी डॉक्टांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.