वडवणी । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील लढा दुष्काळाशी फाउंडेशन गरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. वडवणी तालुक्यातील तीनशे कुटूंबांना 15 दिवस पुरेल एवढे अन्न धान्य किराणा कीट तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दोन हजार मास्कचे वाटप केले आहे.
तालुक्यातील निराधार वयोवृद्ध, अनाथ, दिव्यांग, तसेच ज्या मजुरांच्या हाताला काम नाही. बाहेरून आलेल्या ऊसतोड मजुर गावाबाहेरील शाळेत आपण आपल्या शेतात कोराटाईन केलेल्या मजुरांना त्यांच्या गावो-गावी, खेडो-पाडी, तांडा-वस्ती, शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांना गहु, तांदुळ, तेल, पोहे, साबण या वस्तूंचे वितरण करण्यात आले. याबरोबरच वडवणी तालुक्यातील जनतेला दोन हजार मास्कचे वाटप करण्यात आले. त्यामुळे लढा दुष्काळाशी फाउंडेशन हे गोर गरीबांचा आधार बनत आहे. यामध्ये लढा दुष्काळाच्या टीमचे प्रमुख अॅड.राज पाटील, आशोक निपटे, माऊली सुरवसे, सत्यप्रेम मगर, अॅड.माधव शेंडगे, सुधाकर शिंदे, रामेश्वर गोंडे, अॅड.रुक्मांगद शेंडगे, आरून मोरे, विजय मोरे, नागनाथ मोरे, डॉ.प्रविन सावंत, रवि शेंडगे,सुशील देशमुख, पांडुरंग बादाडे गोकुळ गवारे सह पुर्ण लढा दुष्काळ टीम सहकार्य करत आहे.
Leave a comment