आष्टी । वार्ताहर

करोना या संसर्गजन्य महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील हातावर पोट भरणार्‍या जनतेसाठी अनेक लोक मदतीचा हात देत आहेत आष्टी तालुक्यातील इमणगाव येथील शंभर कुटुंबांना बीड जिपचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, तहसीलदार निलिमा थेऊरकर, गटविकास अधिकारी भागवत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थित सोशल डिस्टन्स पाळून गावातील प्रत्येक कुटुंबाला अत्यावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे म्हणाले, आजच्या कठीण प्रसंगात जो गरजवंतांना मदत करतो तोच खरा माणसातला देवमाणूस आहे. तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी उपस्थितांना कोरोना या महाभयंकर आजार पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आम्ही तुमच्या आरोग्यासाठीच रस्त्यावर फिरत असतो आपणही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गटविकास अधिकारी भागवत ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे, पत्रकार शरद तळेकर, राजुशेठ गोल्हार, सतीश पोकळे, प्राचार्य खेमगर, डॉक्टर वर्षा राऊत आदी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.