आजपर्यंत २०१ जणांचे २१५ स्वॅब ठरले निगेटिव्ह

बीड | वार्ताहर

 

कोरोनात शुन्य कायम ठेवण्यात बीड जिल्ह्याला यश मिळालेले आहे. जिल्ह्यातील एकमेव रुग्ण नगर जिल्ह्यातून बरा होऊन परतला आहे त्यामुळे सध्या जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असला तरी त्यानंतर  नवा रुग्ण सापडलेला नाही. सोमवारी (दि.4) आणखी दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. शिवाय, कोरोना तपासणी केलेल्या संशयितांचा आकडाही दोनशे पार गेला असून २०१ जणांच्या २१५ स्वॅबची तपासणी झाली आहे. 

 

जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील येथील रुग्ण नगर जिल्ह्यात गेल्याने तबलिगींच्या संपर्कात येऊन कोरोना बाधित आढळला होता. नगर येथेच त्याच्यावर उपचार झाले तो बरा होऊन घरीही परतला मात्र, अद्याप त्याचे क्वारंटाईन  दिवस  पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे केंद्राच्या यादीत बीड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यातून आतापर्यंत २०१ जणांचे २१५ स्वॅब तपासले गेले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी दोन अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे बीडकरांनी शून्य कायम ठेवला आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, अनावश्यक गर्दी करु नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतला जात असून त्याची प्रभावी अंमलबजावणीही विविध यंत्रणांकडून केली जात आहे. यामुळे हे शक्य झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून १६३, तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयातून ५२ स्वॅब तपासले गेले आहेत. एकूण तपासलेल्या २१५ पैकी सर्व स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले असून नागरिकांनी प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.