गरजवंतांना दिला एक महिन्याचा शिधा
बीड । वार्ताहर
एक हात-माणसाच्या माणूसकिला हे ध्येय उराशी बाळगून ब्रह्मतेजस्री संघाने कोरोना वैश्विक आपत्तीमध्ये निराधार व हातावर पोट असणार्या गरजवंतांना आपला मदतीचा हात पुढे करून सामाजिक आत्मभान जपण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मतेज स्री संघ अनेक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असतो. कोरोना वैश्विक महामारीच्या आपत्तीमध्ये अनेक हातावर पोट असणारे गरजवंत सध्या उपासमारीमुळे त्रस्त आहेत या सामाजिक वेदनेचा वेध घेऊन ब्रह्म तेजश्री संघातील अनेक महिला भगिनी आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर एकत्र आल्या.
विचार विनिमय केला व आपण या गरजवंतांसाठी पुढे येऊन खारीचा वाटा उचलूया हे निश्चित केले आणि मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने सर्वांनी सेवायज्ञामध्ये आपापल्यापरीने योगदान देण्यास सुरुवात केली आणि यातूनच खास गरजवंतांनासाठी तेल, तिखट, मीठ, साखर, गहू, तांदूळ, असा. शिधा आपण देऊया याचा निर्णय झाला. नंतर गव्हाऐवजी आपण गव्हाचा आटा देऊ हा विचार पुढे आला आणि मग साधारणत: एक महिना पुरेल अशा पद्धतीने या सर्व गरजवंतांना पॅकिंग करून प्रत्यक्ष हा शिधा वाटप करण्यात आला. या समाजोपयोगी कार्यामध्ये श्रीमती मीरा रत्नपारखी-वैद्य रोहिणी बाभुळगावकर, शुभांगी पाठक, कविता बडवे ,मंजुषा कुलकर्णी,वैशाली देशपांडे,अर्चना रत्नपारखी, दीप्ती औटी, वर्षा पसारकर ,मृदुला देशमुख, आशा तुंगतकरमॅडम, शारदा आंबेकर, मंजुषा जोशी-बाहेगव्हाणकर, संगीता घायाळ, मंगल घायाळ, अनिता कुलकर्णी, रश्मी आगवान योगिता थिगळे , स्नेहा पारगावकर, अंदुरकरताई, अंजू जोशी ,शुभांगी धों- कुलकर्णी सुवर्णा देशमुख , शीतल आंबेकर रोहिणी चाटोरीकर, या व इतर अनेक महिला भगिनींनी या सेवा यज्ञामध्ये बहुमोल कार्य करून एक हात-माणसाच्या माणुसकीला हा ब्रह्मतेजस्री संघाचा सामाजिक उपक्रम उत्तम पार पाडला. अनेक गरजवंतांनी योग्य वेळी आम्हाला आधार भेटल्यामुळे खूप समाधान याप्रसंगी व्यक्त केले.
Leave a comment