मुंबई : लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. फक्त ऑरेंज आणि ग्रीनच नाही, तर 'रेड झोन'मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही आता दारुची दुकानं उघडणार आहेत. पण मद्य व्यवहार करताना दुकानदार आणि ग्राहक यांना काही नियम पाळणे बंधनकारक असेल. 

'रेड झोन'मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील मद्यप्रेमींचे चेहरेही आता खुलले आहेत. 'रेड झोन'मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही उद्यापासून (4 मे 2020) मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) राहणाऱ्या मद्यप्रेमींना मात्र तूर्तास आणखी काही काळ वाट पहावी लागेल.

'कोरोना'चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे 'रेड झोन'मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता तिन्ही झोनमध्ये नियम पाळून मद्यविक्रीला मुभा आहे.

नवीन नियम आणि अटी काय?

-बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी
-मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार
-एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार
-प्रत्येक लेनमध्ये जीवनावश्यक दुकाने वगळता केवळ पाच दुकाने उघडली जाऊ शकतात
-जीवनावश्यक दुकानांच्या संख्येवर मात्र बंधन नाही.

रेड झोन 

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन 

रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन 

उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.