परस्पर विरोधी तक्रारीवरुन 15 जणांवर गुन्हा
बर्दापूर। वार्ताहर
शेतीच्या वादातून अंबाजोगाई तालुक्यातील उजणी येथे दोन गटात हाणामारी झाली. दरम्यान दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन बर्दापूर पोलिसांत 15 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेत नांगरण्याच्या कारणावरुन दोन्ही गटात हाणामारी झाली. लाठी, काठी, गज, दगडाने मारहाण केली गेली. दोन्ही गटाचे सदस्य यात जखमी झाले. सुभाष कवडे यांच्या तक्रारीवरुन रामराव कवडे, परमेश्वर कवडे, गोपाळ कवडे, ज्ञानेश्वर कवडे, कल्याण कवडे, जनार्दन कवडे, तुकाराम कवडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला तर, रामराव कवडे यांच्या तक्रारीवरुन विश्वास कवडे, सुभाष कवडे, सुजित कवडे, स्वप्नील कवडे, विशाल कवडे, गिरी कवडे, राजकुमार कवडे, शुभम भोसले यांच्यावर बर्दापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment