78 हजारांच्या दारुची चोरी
बीड । वार्ताहर
संचारबंदी अन् लॉकडाऊनमध्ये दारुची दुकाने फोडण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. शहरालगतच्या समनापूर शिवारातील एका बियरबार व परमिटरुमचे शटर उचकटून चोरट्यांनी विविध कंपनीच्या दारुंच्या बाटल्या चोरुन नेल्या. शनिवारी हा प्रकार समोर आला.
समनापूर शिवारात संजय तुळशीराम महाकुंडे यांचे बियरबार परमिटरुम आहे. शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील देशी-विदेशी कंपनीच्या मद्याच्या तब्बल 78 हजार 170 रुपयांच्या बाटल्या चोरुन नेल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाकुंडे यांनी ग्रामीण ठाण्यात तक्रार नोंदवली. अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक सुजीत बडे तपास करत आहेत.
Leave a comment