नेकनुर/वार्ताहर
गुरुवारी नेकनुर पोलीस स्टेशनचे नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या सपोनी केंद्रे यांनी शुक्रवार आणि रविवारी स्वतः रस्त्यावर उतरत शिस्तीचा बडगा उगारला यामुळे बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीला काहीसा लगाम लागल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारचा दिवस नेकनुर पोलिसांसाठी दुर्दैवी ठरला एका चांगल्या अधिकाऱ्यांला कर्मचाऱ्याच्या आतातायीपणामुळे नाहक मोठ्या शिक्षेस बळी पडावे लागले. सपोनी सचिन पुंडगे यांच्यावरील कारवाई बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होण्याचे कारण म्हणजे कर्तव्य करताना सर्वांत मिसळत विनाकारण कोणालाच त्रास होणार नाही याची काळजी घेत विनंती बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वागण्याचा मोठा फटका बसला . पोलीस स्टेशनला घर मानलेल्या या अधिकाऱ्यांला पूर्णवेळ येते थांबने नडल्याचे यामुळे दिसून आले. त्यांच्यावरील कारवाईनंतर नेकनुर पोलीस स्टेशन ची सूत्रे सपोनी केंद्रे यांच्याकडे आली . दोन दिवसात संचारबंदी शिथिलतेत लवकर हजर होत कर्मचार्यासोबतच बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी स्वतः रस्त्यावर ठाण मांडल्याने अनेक व्यवसायिकाचा हिरमोड झाला शिवाय अनावश्यक गर्दीला ब्रेक लागल्याचे चित्र रवीवारी पाहायला मिळाले.
Leave a comment