नवी दिल्ली ; कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन 3.0 घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम गरीब कुटुंबांवर झाला आहे. त्यामुळे आता या लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा 500 रुपये गरीब महिलांच्या जनधन खात्यात जमा करणार आहे, ही मदत तीन महिन्यांसाठी दिली जाईल. सरकारने महिला जन धन खात्याअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 500 रुपयांचा दुसरा हप्ता पाठविणे सुरू केले आहे.
500 रुपयांची रक्कम खातेधारकांच्या खात्यात वर्ग केली जात आहे. जन धन खातेधारकांना ही रक्कम दिली जात आहे. परंतु, लोकांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्यानंतर बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच बँकेने टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याची पद्धत आखली आहे. एसबीआयने एक टाइम टेबल तयार केला आहे, त्या आधारे लाभधारक त्याच्या खात्यातून पैसे काढू शकतील.
आपण या पद्धतींद्वारे पैसे काढू शकता -
आपल्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन रुपे कार्ड, किंवा बँक मित्रमार्फत पैसे काढू शकता अशी विनंती केली. बँकेच्या शाखेत गर्दी होऊ नये. कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अलीकडेच सरकारने यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली.
9 मेपर्यंत पहिला हप्ता बॅंक खात्यात जमा होईल
शासकीय आदेशानुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये रक्कम तीन महिन्यांसाठी देण्यात येईल. त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार, खातेधारकांच्या खात्यात पैसे वेगवेगळ्या दिवसात जमा केले जातील, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही.
हे नियम आहेत
>> जन धन खात्यांचा ज्यांचा शेवटचा अंक 0 किंवा 1 आहे, उद्या त्यांच्या खात्यात पैसे जोडले जातील म्हणजे 4 मे रोजी.
>> जन धन खात्यांचा शेवटचा अंक 2 किंवा 3 आहे, त्यांच्या खात्यात 5 मे रोजी पैसे जमा होतील.
>> जन धन खात्यांचा शेवटचा अंक 4 किंवा 5 आहे , त्यांच्या खात्यात 6 मे रोजी पैसे जमा होतील.
>> ज्याच्या जन धन खात्यांचा शेवटचा अंक 6 किंवा 7 आहे, त्यांच्या खात्यात 8 मे रोजी पैसे जमा होतील.
>> ज्याच्या जन धन खात्यांचा शेवटचा अंक 8 किंवा 9 आहे, त्यांच्या खात्यात 1 मे रोजी पैसे जमा होतील.
टाईम टेबलच्या आधारे पैसे काढता येतील
कोरोना व्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर पसरला आहे. त्यामुळे बँकांनी सोशल डिस्टेंसिंग ठेवण्याचे सांगितले आहे. बँकांनी खातेदारांना त्यांच्या खाते क्रमांकाच्या आधारे टाइम टेबल जारी केले आहे, त्या आधारे लाभार्थी त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढू शकतील. बँकांनी या टाइम टेबलविषयी सांगितले आहे की, ते फक्त या महिन्यासाठीच लागू होतील.
Leave a comment