मुंबई । वार्ताहर
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊमध्ये जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आता ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानं बहूतांश नागरिक बाहेरगावी अडकून पडले आहे. तसेच काही जिल्ह्यात अनेक मजूर, परप्रांतीय, विद्यार्थी सुद्धा गेल्या महिनाभरापासून अडकलेले आहेत. अशा नागरिकांना त्यांच्या मुळगावी जाता येणार आहे. यासाठी सरकारकडून ऑनलाईन पास देण्यात येणार आहे. सदरील पास ऑनलाईन उपलब्ध होणार असून त्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन माहिती भरायची आहे. माहिती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सदरील नागरिकांना संबंधित जिल्ह्यातून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना प्रवास करण्यासाठी एक पास मिळेल. या पासेसच्या मदतीनं नागरिकांना आपआपल्या स्वगृही जाता येणार आहे.
Leave a comment