प्रियकरासह दोघांविरुध्द केज पोलीसात गुन्हा
केज । वार्ताहर
‘तू नाचायला जाऊ नको’असे म्हणून एका प्रियकराने त्याच्या वीस वर्षीय प्रेयसीच्या पायावर कोयत्याने वार करून तिला जखमी केल्याची घटना केज येथील फुलेनगर भागात घडली असून पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
केज येथील आकाश बाजीराव चाळक याचे फुलेनगर केज येथील नाचकाम करणार्या निकिता मोहनराव काळे (20) या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. आर्थिक चणचणीमुळे निकिता ही आकाश यास म्हणाली की, मी आता पार्टीत वाचायला जाणार आहे. असे म्हणताच आकाश यास राग आला आणि त्याने व त्याच्या मित्राने निकिता हिच्या मावशीच्या घरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास प्रवेश करत निकीताच्या पायावर व मांडीवर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यात तिचे पाय अर्धवट तुटले असून तिच्यावर लातूर येथील रुग्णालयत उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबा नुसार केज ठाण्यात भा.दं.वि. कलम 326, 425 व 34 नुसार आकाश बाजीराव चाळक आणि अन्य एक त्याचा साथीदार यांच्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर दुखापत व जायबंदी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे यांनी मुख्य आरोपी आकाश चाळक यास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर आणि हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले यांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस संतोष मिसळे हे करीत आहेत.
Leave a comment