गेवराई । वार्ताहर
विहिरीतून पिण्याचे पाणी शेंदत असताना पाय घसरून विहरीत पडुन रंगुबाई विनायक पवार (42) या महिलेचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील खांडवी जवळील अंबुनाईक तांडा येथे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
तिच्या मुलाने आरडाओरडा केला असता तांड्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला विहरीतुन वर काढले विहरीत जास्त पाणी असल्याने तिचा बुडून मृत्यू झाला होता.नातेवाईकांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत महिलेस पति दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Leave a comment