आ.संदीप क्षीरसागर, डॉक्टर बालाजी जाधव यांचा पुढाकार

बीड । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टर आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी धावपळ करत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून डॉक्टर रात्रं दिवस रुग्णांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत डॉक्टर देखील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणे गरजेचे आहे तेव्हाच कुठे कोरोनाशी दोन हात करण्यात डॉक्टर मंडळींना बळ प्राप्त होईल. याच अनुषंगाने राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बालाजी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, ना.अजित दादा पवार, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या आदेशावरून आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील डॉक्टरांना 2000 फेस शिल्ड्चे वाटप केले जात आहे. बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल आणि ओस्तवाल हॉस्पिटल मधून या शील्ड डॉक्टरांना प्राप्त करता येतील. तसेच पूर्ण जिल्ह्याभरात देखील या किट वाटप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी डॉक्टर  सेलच्या वतीने हा जो स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे ते उपक्रमाचे सर्व डॉक्टर मंडळींकडून स्वागत होत आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या व राष्ट्रवादी डॉक्टर सेल च्या माध्यमातून राज्यभरात 1,25,000 फेसशिल्डचे तर बीड जिल्ह्यात 4000 फेसशिल्डचे वितरण करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.