आष्टी । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका असल्याने गेल्या दीड महिन्यापासून सर्वच धार्मिक विधी, विवाह सोहळे स्थगित आहेत. मात्र आष्टी तालुक्यातील खडकत येथे सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन अत्यंत साध्या पद्धतीने शनिवारी (दि.2) दुपारी साडे बारा वाजता दोन विवाह पार पडले.
विशेष म्हणजे वधू आणि वर यांचे घर एकमेकांशेजारीच असल्याने हा विवाह अंगणातच पार पडला. कोरोनामुळे अनेकांचे विवाह सोहळे लांबणीवर पडलेले आहेत तर अनेक नव वधूवर एकमेकांच्या परिचयातच अडखळले आहेत. त्यामुळे साहजिकच इच्छा असूनही अनेकांचे मनोमिलन लांबले आहे. मात्र अशातही नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सोशल डिस्टंन्स ठेऊन विवाह पार पडला. याच नियमाचे पालन करत तालुक्यातील खडकत येथील चि.सौ.कां.ऋतुजा देवराव जेवे हिचा विवाह चि.संदिप हरिभाऊ सुर्यवंशी यांच्याशी तर अमृता भाऊसाहेब जेवे हिचा विवाह संतोष नामदेव सुर्यवंशी यांच्याशी अंत्यंत साध्या पद्धतीने घरातील अंगणात तसेच दहा नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
Leave a comment