बीड | वार्ताहर
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू आहेत. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या सुरू ठेवण्यात येण्याच्या वेळांबाबत उद्या ६ एप्रिल २०२० पासून बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी लागू केले आहेत.दरम्यान आज रविवारी सकाळी या आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे.
सुधारित आदेशानुसार, जिल्ह्यातील बीड, माजलगाव अंबाजोगाई व परळी या चार नगर परिषदांची हद्द वगळता उर्वरित जिल्ह्याच्या भागांमध्ये या सर्व जीवनावश्यक सेवा देण्याच्या अंशतः सुधारणा करून आस्थापना सम दिनांक जसे 6, 8, 10, 12 व 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. तसेच बीड,माजलगाव, अंबाजोगाई व परळी या चार नगर परिषदा शहरांमध्ये विषम दिनांक 7,9, 11 व 13 स.11 ते 3 वाजेपर्यंत सुरू राहतील.
कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये यासाठी जिल्ह्यात 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेले विविध आदेश, सुधारणा आदेश लागू आहेत . तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वेळा आस्थापनांसाठी वरील सुधारित आदेश देण्यात आले आहेत.
Leave a comment