बीडला आणखी एक आमदार मिळणार
बीड । वार्ताहर
विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक पद्धतीने पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची येणाऱ्या विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याचं बोलले जात असून त्यांची उमेदवारी पक्ष नेतृत्वाने निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे
विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान स्थापन करून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याच वेळी त्यांची अपेक्षा विधानपरिषदेची होती किंवा त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. पण या दोन्ही गोष्टीत यावेळी झाल्या नाहीत.
मुंडेंच्या या नाराजीची दखल मात्र भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेतली गेली. त्यामुळे 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नियुक्त्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे ,
यावेळेस भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली तर भविष्यात त्याची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागेल. त्यामुळे भाजप यावेळेस पंकजा मुंडेंची उमेदवारी नाकारू शकत नाहीत, असे म्हंटले जात आहे.
दरम्यान कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. यावर आता निवडणूक आयोगानेही सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.यामध्ये भाजपा ला 3 जागा मिळणार आहेत यामध्ये पंकजा मुंडे ,विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत ,पंकजा मुंडे यांनी नुकतेच ऊसतोड कामगार प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले होते ,राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे पक्षालाही माहीत आहे ,त्यांचे नाव अंतिम मानले जात असून त्यामुळे जिल्ह्यात आणखी एक आमदार वाढणार आहे ,यामुळे राज्यभरात ओबीसी ,वर्गामध्ये उत्साह संचारला आहे
Leave a comment