कडा ग्रामपंचायतची कारवाई

 

आष्टी  । वार्ताहर 

लॉकडाऊन शिथिल असण्याच्या काळात विनामास्क फिरणाराकडून सुमारे वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे यांनी दिली.

   कोरोना लॉकडाऊन काळात घराबाहेर पडू नका , पडल्यास तोंडाला मास्क असावा असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जाते . मात्र अनेकजण याचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात . कडा ग्रामपंचायतने देखील वारंवार आवाहन करून ही लोक ऐकत नसल्याने बुधवार पासून दंड वसुलीस सुरवात केली . यावेळी सकाळी ७ ते साडेनऊ या वेळेत विनामास्क फिरणाराकडून चार हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल केला तर शुक्रवारी तब्बल वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी खिलारे यांनी दिली . यापुढेही अशी कारवाई चालूच राहणार असून मास्क न लावता फिरणारा बरोबर रस्त्यांवर थुंकणार्याकडून ही दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कारवाईत सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.