आडस(वार्ताहर)
धारूर तालुक्यातील रुई-धारूर येथील सदाशिव दशरथराव थोरात गुरुजी यांचे धाकटे बंधू गणपत थोरात हे बीड तालुक्यातील गुंदा येथे संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत होते .चोसाला जवळील वडगाव येथे दहावीच्या पेपर संबंधित शिक्षकाकडे जात असतांना धुळे - सोलापुर महामार्गावर त्यांची मोटारसायकल दुभाजकावर आढळल्याने अपघात झाला त्यात त्यांना पोटात मार लागल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्या वर यशस्वी शस्त्रक्रिया ही झाली होती
परंतु त्यांच्या शरीराने प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत २८ एप्रिल ला पहाटे मालवली.
सध्या कोविड-१९ मुळे संचारबंदी असल्याने उपचारासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या .प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून २८ एप्रिल रोजी त्यांच्या मुळ गावी रुई-धारूर येथे ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.अनेकांनी सोशल मीडियावर श्रधंजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चयात आई,दोन भाऊ,पत्नी,ऐक मुलगा व एक मुलगी आहे, त्यांच्या दु:खद निधनाने थोरात परिवार आणि रुई-धारूर परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave a comment