गांधीनगर
मुंबई शहरातील बीकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीचं हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचं बोललं जात आहे.
सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा यापुढे गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. याचं मुख्यालय गांधीनगर, गुजरात येथे असणार आहे.
केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण स्थापना 27 एप्रिल 2020 ला केली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गांधीनगर, गुजरात येथे असेल, अशी माहिती आहे. आयआयएफसी प्राधिकरण मुख्यालय गांधीनगर येथे उभारण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जीआयएफटी सिटीचे एमडी आणि ग्रुप सीईओ तपन रे यांनी स्वागत केलं आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे एकाच ठिकाणाहून सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा मिळतील, ज्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल. अशी प्रतिक्रिया सीईओ तपन रे यांनी दिली आहे.
Leave a comment