केज । वार्ताहर
कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्वांनी नियम आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे.लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाप्रवेश बंदी असताना सहा जणांनी गावात प्रवेश केला. ग्रामसेकांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलिसात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैभव चोपणे ,अण्णा गायकवाड,रमेश आखाडे, राजेश खोड,भांगला शुक्लाल मोरे,राजू मोरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले. पुणे,हैद्राबाद, शेंदवा आदी ठिकाणावरुन येऊन गावात प्रवेश केला. या प्रकरणी युसूफवडगावचे ग्रामसेवक सुरेश खाडप,कुंभेेफळचे ग्रामसेवक शेख तन्वीर,जवळबनचे ग्रामसेवक विजयकुमार साखरे यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गु.र.नं. 84/85/86 कलम 188,269,270,2005 51 (ब),1951 -17 नुसार युसूफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.पिंपळे, पवार हे तपास करत आहेत.
Leave a comment