परळी । वार्ताहर

कोरोनाच्या संकट काळात कोरोना विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणार्‍या डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने परळी तालुक्यातील डॉक्टरना मोफत फेस शिल्डचे  वाटप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या संकटातही आपले कार्य जोमाने करत आहात रूग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. यापुढे अशीच सेवा द्यावी तसेच तुमच्या कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.  फेसशिल्ड मुळे डॉक्टर यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळणार आहे असलेल्याचे मुंडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  खा.सुप्रिया सुळे, ,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी फेस शिल्ड मास्क उपलब्ध करून दिले. या अगोदरही डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे परळीतील डॉक्टर समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे ,परळी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष  डॉ.ल.डी.लोहिया.डॉ.अजीत केंद्रे ,डॉ.मधुसदन काळे,डॉ.सूर्यकांत मुंडे,डॅा.दिपक पाठक ,डॉ.गुरुप्रसाद देशपांडे ,डॉ.राजेश जाजु,डॉ.विजय रांदड ,डॉ.मुंकुद सोंळके ,डॉ.दिनेश लोंढा राष्ट्रवादी डॉक्टर तालुका अध्यक्ष डॉ.आनंद टिंबे.डॉ.मोसिन मानीयार उपस्थित होते.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.